सुप्रिया सुळे कुणाल कामराच्या भेटीला, 'शट अप या कुणाल'मध्ये मुलाखत रंगणार?

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही शट अप या कुणाल  मध्ये हजेरी लावणार का, याची उत्सुकता लागली आहे. सुप्रिया सुळेंनी स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरासोबतच्या भेटीचा फोटो ट्वीट केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
कुणाल कामराने संजय राऊत यांना ‘शटअप या कुणाल’ शोच्या दुसऱ्या सिझनचे पहिले पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. ‘शटअप या कुणाल’ शोसाठी कुणालने रविवारी (११ ऑक्टोबर) संजय राऊत यांच्यासोबत मुलाखतीचे चित्रिकरण केले. राज्य ते देशाच्या राजकारणातील घडामोडी, मोदी सरकार ते महाविकास आघाडी सरकार, सुशांतसिंह प्रकरण ते कंगनाशी झालेला वाद, राज्यातील कोरोनाची स्थिती, कन्हैया कुमार ते मनसे या मुद्द्यांवर मुलाखत रंगली. खार येथील ‘द हॅबिटेट स्टुडिओ’त दीड तासांची ही मुलाखत झाली.

Post a comment

0 Comments