प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्यांना मंजुरीवैजापूर - प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत वैजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात २२.६८ किमी लांबीच्या रस्त्यांना मंजुरी मिळाली असुन ही कामे लवकरच सुरु होणार आहेत. अशी माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस  व माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी लोकमत  सखी  बोलताना सांगितले. प्रशासकिय स्तरावर या रस्त्यांच्या कामकाजाबाबत कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ठ केले. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे मागील आठवड्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतुन २०२०-२१ च्या तिसऱ्या टप्प्यातील तालुक्यातील विविध रस्त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार तालुक्यातील १४ गावातील जवळपास २३ किमी लांबीच्या रस्त्यांचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्यात चांडगाव, भग्गाव व लोणी खुर्द या गावात दलित वस्तीमधील रस्ते, परसोडा ते बेंदवाडी, भायगाव, जांबरखेडा, बाभुळगाव नालेगाव, महालगाव ते शिरसगाव, लाडगाव ते वांजरगाव, माळीघोगरगाव ते चेंडुफळ, संजरपुरवाडी, नालेगाव, हाजीपुरवाडी,.अगरसायगाव, शिवराई, सवंदगाव, पानगव्हाण, जातेगाव, नागमठाण, जांबरगाव,.सटाणा, म्हस्की, पानवी खंडाळा, लाख खंडाळा या रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांची कामे करतांना यादी क्रमांकानुसारच प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या रस्त्यांमुळे तालुक्याच्या विकासकामास मोठा हातभार लागणार असल्याचे मा नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी यांनी सांगितले.

Post a comment

0 Comments