जाणून घेऊया पहिल्या मालीच्या रंगाचं महत्व

(योगिता बनसोडे),औरंगाबाद:- नवरात्र म्हटलं की उत्साह. प्रत्येक वर्षी ह्या नावरात्रीचीच आपण आतुरतेने वाट पाहत असतो. 
आजूबाजूला नऊ दिवस अगदी आनंदी वातावरणाचे दिवस आपल्याला प्रत्येकालाच अनुभवायला मिळतात. 
मुळात नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगांना महत्त्व असते. आपण नेहमी पाहतो की आपल्या आजूबाजूला अगदी पहिल्या दिवसापासून ते नवव्या दिवसापर्यंत ठराविक रंगांना महत्त्व असते. 
पण नवरात्रीच्या वेळी हे वेगवेगळे 9 रंग नक्की का घातले जातात? त्यांचे काय महत्त्व आहे. याची तुम्हाला माहिती आहे का? दुर्गाची नऊ वेगवेगळी रूपं आणि त्याप्रमाणे त्याचे रंग या दिवशी घालायची प्रथा आहे. भारतामध्ये दुर्गा अर्थात देवीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक आख्यायिकादेखील आहेत. नवरात्रीच्या या उत्सवात नवरात्रीचे नऊ रंग आणि रंगांची उधळण कशाप्रकारे असते आणि कोणते रंग वापरण्यात येतात, हे आपण बघणार आहोत.
 दुर्गेची नऊ रूपं अर्थात शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, काळरात्री, महागौरी आणि सिद्धीत्री यांची या दिवसात पूजाअर्चा करण्यात येते. या देवींना आवडणाऱ्या रंगांवरून नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या रंगांचे महत्त्व ठरलेले आहे.
 जाणून घेऊया त्याचे माणासच्या आयुष्यात काय स्थान आहे. पण बरेचदा वारानुसारही रंगाची निवड करण्यात येते. पण मूळ रंग आणि त्याचे महत्त्व हे देवीच्या आवडीनुसार असल्याचे म्हटले जाते. 
गेल्या दशकापासून ही प्रथा जास्त प्रचलित झाली आहे. एकाच रंगाची वस्त्र परिधान केल्याने एकोपाचा संदेश देण्यात येतो अशी यामागची भावना आहे. 
नवरात्रीचा पहिला दिवस हा शैलपुत्री देवीचा मानण्यात येतो. शैलपुत्री देवी दुर्गाचे पहिले रूप आहे. नवदुर्गेतील ही पहिली दुर्गा असल्याने या देवीची पूजा पहिल्या दिवशी करण्यात येते. पर्वतराज हिमालयच्या पोटी जन्म घेतल्यामुळे हिचे नाव शैलपुत्री असे ठेवण्यात आले. 
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या देवीची उपासना करण्यात येते. या दिवशीचा रंग करडा आहे. या देवीला करडा रंग प्रिय असून ही देवी दिसायला भयानक असली तरीही नेहमी शुभफळ देणारी देवी मानण्यात येते. दुष्टांचे विनाश करणारी ही देवी असून हिच्या स्मरणाने दानव, दैत्य, राक्षस, भूत, पिशाच भयभीत होतात असा समज आहे. ग्रहांच्या बाधा दूर करण्यासाठीही या देवीची आराधना केली जाते. म्हणूनच यासंबंधित करडा रंग या देवीला प्रिय आणि महत्त्वाचा मानण्यात येतो. आयुष्यातील अंधःकार दूर करण्यासाठी या देवीला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे.

Post a comment

0 Comments