अर्णब गोस्वामी परमबीर सिंहांना कोर्टात खेचणार

मुंबई:- मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, TRP मोजण्यासाठी मुंबईत जवळपास 2000 लोकांच्या घरी बायोमीटर्स लावण्यात आले आहेत. या बायोमीटर्सवर लक्ष ठेवण्याचं काम हंसा या एजेन्सीला देण्यात आलं होतं. या एजन्सीचा एक व्यक्ती टीव्ही चॅनल्सला TRP मध्ये फेरफार करण्यासाठी मदत करत होता. हंसा आणि टीव्ही मीडियाचा TRP मोजणाऱ्या BARC कंपनीने याबाबत तक्रार दिली होती.

Republic TVनं एका कंपनीच्या मदतीनं TRP रेटिंग बनावट पद्धतीने वाढवल्याचं केल्याचं समोर आलं आहे. अशिक्षित लोकांच्या घरात इंग्रजी चॅनल्स चालू ठेवण्यासाठी पैसे दिले होते. त्यांच्या मालक आणि संचालकांविरोधात कारवाई करणार करू," असं मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितलं आहे. मुंबईत टीव्ही चॅनेलबाबत TRP रॅकेट सुरू असल्याचा संशय आहे, पैसे देऊन TRP रेटिंग वाढवण्यात येत होती. घरोघरी चॅनेल सुरू ठेवण्यासाठी ५०० रुपये देण्यात आले, याबाबत तपास सुरू आहे, असं त्यांनी पुढे सांगितलं आहे.पोलिसांचे आयुक्त परमबीर सिंह यांनी एक पत्रकार परिषद घेऊन यांची माहिती दिली आहे.


Post a comment

0 Comments