मराठा समाज बांधव आरक्षणासाठी आक्रमकचक्क स्वतःच्या रक्ताच्या सह्याचे दिले निवेदन
वैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) : 


आज रोजी वैजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून शिवरायांच्या पुतळ्या समक्ष मराठा क्रांती मोर्च्या च्या पदाधिकारी यांनी स्वतःच्या रक्ताच्या सह्या करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तहसील कार्यालय मार्फत निवेदन देण्यात आले. 

काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण ला न्यायालयात स्थगिती मिळाल्याने मराठा बांधव यांनी आक्रमक होत आंदोलन केले होते.
 मराठा आरक्षण प्रकरणात न्यायालयाने स्थगित दिलेली आहे असून याच काळात महाराष्ट्र शासनाने पोलीस भरती ची  घोषणा केली.
म्हणून जो पर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत महाराष्ट्र शासनाने पोलिस भरती प्रक्रिया स्थगित करावी. तसेच मराठा आरक्षणाचा  प्रश्न सुटलेला नसतांना जर पोलीस भरती प्रक्रिया केली तर मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होईल .
या कारणामुळे  आज मराठा क्रांती मोर्चा समितीचे राज्य समन्वयक सुनील बोडके व सोमनाथ मगर यांच्या नेतृत्वाखाली रक्ताच्या स्वाक्षरीने तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर सुरेश राऊत, वाल्मिक इंगळे, मोती वाघ ,शिवाजी रक्ताटे, अविनाश चव्हाण,रामदास शिंदे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Post a comment

0 Comments