शिवसेना माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी यांची हत्या; २४ तासात दोन हत्येच्या घटनांनी लोणावळा हादरलं

पुणे : शिवसेनेचे माजी शहरप्रमुख आणि शिवसेना संस्थापक उमेशभाई शेट्टी यांचे पुत्र राहुल उमेश शेट्टी  यांचा निर्घृण खून करण्यात आला आहे. आज सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरासमोर जयचंद चौकातच ही धक्कादायक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल शेट्टी यांच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार शस्त्रांनी वार करत जवळून तीन गोळ्या मारण्यात आल्या आहेत. त्यांना तातडीने लोणावळ्यातील परमार रुग्णालयात हालविण्यात आले. मात्र, तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घेषित केलं. यावेळी परमार रुग्णालयाच्या बाहेर शेट्टी सर्मथकांनी मोठी गर्दी केली होती.

Post a comment

0 Comments