सिरेसायगाव येथे एकाचा तीक्ष्ण हत्याराने निर्घुण खूण.


गंगापूर(प्रतिनिधी
 ( प्रकाश सातपुते )

गंगापूर तालुक्यातील सिरेसायगांव ते शंकरपुर रस्त्यावर औरंगाबाद तालुक्यातील वडगाव कोल्हाटी येथील सुनील शेजुळ यास आणून चाकूने पोटात, गळ्यावर ,हातावर वार करून खुन करून पोबारा केल्याची घटना १४ ऑक्टोबर रोजीच्या मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकारणी अज्ञात मारेकऱ्या विरोधात शिल्लेगांव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
          पोलीसाकडुन मिळालेल्या माहितीनुसार वडगांव कोल्हाटी येथील सुनील दादाराव शेजुळ वय ४० यास १४ व१५  ऑक्टोबर रोजीच्या मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अज्ञातांनी गंगापुर तालुक्यातील सिरेसायगांव रस्त्यावर आणून चाकुने पोटात, गळ्यावर तसेच हातावर वार करून खुन करण्यात आला या घटनेची माहिती शिल्लेगांव पोलीसांना मिळाली असता उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे,शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर, पीएसआय राम बाराहाते, सतीश दिंडे,पिएसआय सांळुके, विठ्ठल राख, रामेश्वर धापसे, आय बाईक पथकचे पो ना. एल एच.सपकाळ.पो.काॅ विकास नजन.संतोष धाडबले,गिरी,आदींनी पाहणी केली घटनास्थळावर पोलिसांना मिरची पुड ,दारुच्या बाटल्या, तसेच दोन चाकु आढळून आले ते जप्त करण्यात आले यावेळी श्र्वान पथकास पाचारण करण्यात आले होते मात्र श्र्वानास काहीच मागमूस हाती लागले नाही
श्र्वान पथकाचे हेड कॉन्स्टेबल व्यवहारे, तळेकर, वाहन चालक शिंदे,श्र्वानाचे नाव स्विटी आदींनी धाव घेत पाहणी केली उपस्थित होते.खुन कोन्ही व काय हेतूने केला याचा तपास ऊपविभागीय पोलीस आधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्लेगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर आदी करत आहेत

Post a comment

0 Comments