मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राजकीय पक्षांच्या कार्यालय व निवासस्थाना समोर आक्रोश आंदोलन

दौंड -
     मराठा क्रांती मोर्चा दौंड शहर व तालुका यांच्यावतीने मराठा आरक्षण स्थगितीच्या निषेधार्थ व मराठा समाजाच्या इतर मागण्या त्वरित मान्य करण्यासाठी आज आक्रोश आंदोलन करण्यात आले. दौंड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय ,राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कार्यालय, चौफुला येथील शिवसेना कार्यालय, खुटबाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, तसेच राहु येथील  भाजप आमदार राहुल कुल यांचे निवासस्थानी आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव उपस्थित होते. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला. 

प्रतिनिधी निलेश जांबले सह सचिन आव्हाड मराठा तेज दौंड पुणे.

Post a comment

0 Comments