म्हसळा तालुक्यातील काही गावात वादळी वाऱ्यामुळे झाले घरांचे नुकसान


म्हसळा रायगड: 
हवामान खात्याने १७ ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा तसेच अरब महासागर किनार पट्टी लगत जिल्ह्यात जोरदार पाऊस व विजेच्या कडकडाहटासह जोरात वादळी वारा वाहण्याची शक्यता दर्शवली आहे, रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील वाघाव, वाघाव बोद्धवाडी, व कळखीचा कोंड ह्या तीन गावात याचा झटका काल संध्याकाळी जाणीवला, अचानक "निसर्ग तुफान" समान पाऊस सह चक्री वादळामुळे जोरदार वाऱ्याने येथे घरावरचे कवळे, कोने व पत्रे उडाले व एक घरावर झाड पडून घराचा मोठा नुकसान झाला आहे तरी  सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही झाली आहे,असंख्य झाडे जमीनदोस्त झाले, भली मोठी झाडे पडल्याने विजेचे खांबे पडून येथील वीज पूर्णपणे खंडित झाली आहे, ही माहिती मिळताच म्हसळा तहसीलदार श्री. शरद गोसावी यांनी स्वतः व मंडलाधिकारी शाह, तलाठी व ग्रामसेवक सह नुकसान झालेल्या गावात पोहचून प्रत्येक्ष पाहणी केली व तहसीलदारांच्या आदेशानुसार शासनाकडून वादळामुळे नागरिकांच्या झालेल्या नुकसान भरपाई साठी मदद मिळण्या करिता तात्काळ पंचनामे ही करण्यात आले.
प्रतिनिधी:रिजवान मुकादम सह मराठा तेज ब्युरो 
म्हसळा, रायगड.

Post a comment

0 Comments