आमचा लढा हा कुणा दुसऱ्या जाती विरुद्ध नसून मराठ्यांच्या हक्कासाठी आहे- छत्रपती संभाजीराजे.

कोल्हापूर दि, २५ रविवारी : आमचा लढा हा कुणा दुसऱ्या जाती विरुद्ध नसून मराठ्यांच्या हक्कासाठी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करत असताना, अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांना सोबत घेतलं. राजर्षी शाहू महाराजांनी जेंव्हा आरक्षण दिलं, तेंव्हा केवळ मराठ्यांचा विचार केला नाही, तर बहुजन समाजातील सर्व जातींना न्याय दिला. त्या बहुजन समाजामध्ये मराठा  सुद्धा समावेश होता. आज मराठा समाजालाच का म्हणून बाहेर ठेवण्यात आलं? जसं इतर जातीतील गरिबांना आरक्षणाचा लाभ मिळतो, त्याच प्रमाणे मराठा समाजातील गरिबांना सुद्धा मिळाला पाहिजे.

आज दसऱ्याच्या शुभ दिनी अठरा पगड जाती, बारा बलुतेदार समाजाच्या वतीने कोल्हापूर च्या शिवाजी पेठेत शस्त्र पूजनाच्या कार्यक्रमात सहभागी झालो. यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला सर्व जातींच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दिला.

शस्त्रांची पूजा करणे ही आपली परंपरा आहे. पण आता लेखणीची पूजा किंवा लेखणीला महत्व देण्याचा हा काळ आहे. मराठा आरक्षणाचा आपला लढा हा सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. येत्या 27 तारखेला स्थगिती उठवण्यासाठी सुनावणी आहे. तिथे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सरकार ने संपूर्ण ताकद झोकून देऊन आपली बाजू मांडली पाहिजे, याकामी समाज पूर्ण सहकार्य करेल. पण सरकार ने सुद्धा जबाबदारी ने वागण्याची आवश्यकता आहे.

मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत आहे की, अनेक वेळा आश्वासन देऊन सुद्धा एम पी एस सी च्या 2019 च्या पात्र उमेदवारांना नियुक्त्या दिल्या गेल्या नाहीत. या मध्ये सर्व जातीच्या मुलांचा समावेश आहे. न्यायालयाचा निकाल यायच्या आधी त्यांची सर्व ती प्रक्रिया पूर्ण होऊन ट्रेनिंग सुरू झाली असती. कोरोना चे कारण देऊन नियुक्त्या देण्यास उशीर केला गेला. आता मुलांनाच न्यायालयात जाण्याच्या सूचना सरकार करत आहे.  सरकार ने गोष्टी गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजे. 

आता नवीन महावितरणच्या भरती ची घोषणा केली सरकार ने. अहो आधी ज्या मुलांच्या भरत्या झाल्या आहेत त्यांच काय? सरकार ने न्यायाची भूमिका घ्यावी, ही दसऱ्याच्या दिवशी अपेक्षा.

Post a comment

0 Comments