डोंबिवलीतील पतपेढीच्या मॅनेजरचा कार्यालयातच गळफास

डोंबिवली : डोंबिवलीत पतपेढी मॅनेजरने पतपेढी कार्यालयातच गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. योगेश आरोटे (४४) हे मॅनेजरचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. 

डोंबिवलीजवळील ठाकुर्ली परिसरात असलेल्या सहकारमित्र मधूबन पतपेढी आहे. या पतपेढीत योगेश आरोटे या मॅनेजरचे काम करत होते. या पतपेढीच्या कार्यालयाची चावी ही त्यांच्याकडे असायची. आजही नेहमीप्रमाणे ते चावी घेऊन पतपेढीत आले. पतपेढीचे गेट उघडून ते आत बसले होते. काही वेळानंतर पतपेढीतील एक कर्मचारी त्या ठिकाणी आला. त्यावेळी पतपेढीच्या एका रुममध्ये योगेश हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याने रामनगर पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

मी स्वत: हून माझे जीवन संपवत आहे. यात कोणी दोषी नाही. माझा अंत्यविधी इथेच करणे,” असे त्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. 

त्याच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुलं असा परिवार आहे. सुसाईड नोट मिळाल्यानंतर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Post a comment

0 Comments