सरकार भुमरे ........ तुमचा आमच्यावर भरोसा नाय काय...... नाय ....सरकार ?( नगर विकास खात्याचा निधी नगर परिषदेला वगळून बांधकाम विभागाला वर्ग )

पैठण प्रतिनिधी विजय खडसन: --- 
सरकार भुमरे यांनी शहराच्या विकासासाठी कोरोनाच्या संकटकाळात ही १२ कोटी ३५ लाख इतका निधी नगर विकास खात्या मार्फत ठोक तरतूद ९ कोटी ३५ लाख रुपये व वैशिष्ठपूर्ण कामासाठी ३ कोटी इतका निधी मंजूर केला. तो निधी नगरविकास खात्याचा असतांना सर्व विकास कामे ही पैठण शहराच्या हद्दीतील असतांना व नगरपरिषद सारखी मोठी यंत्रणा पैठण शहरात असतांना तो निधी बांधकाम विभागाला वर्ग केला असल्याने पैठण नगर परिषदेमध्ये शिवसेनेचे ८ नगरसेवक असतांना संबंधित निधी नगर परिषदेला वर्ग न केल्याने सरकार भुमरे यांचा त्यांच्याच नगरसेवकांवर भरोसा नाय काय....सरकार विश्वास नसल्याची चर्चा पैठण शहरात होतांना दिसत आहे. 

नगर परिषदे कडे आज सक्षम यंत्रणा आहे याचं यंत्रणेने पैठण शहरात अनेक विकास कामे केली आहेत आज रोजी नगर परिषदेकडे ४ ते ५ अभियंते आहेत त्यात स्थापत्य अभियंता, पाणीपुरवठा अभियंता, इलेक्ट्रिक अभियंता असे  तांत्रिक अभियंते असतांना नगरपरिषद हा निधी वापरण्यासाठी सक्षम आहे तरीही नगरविकास खात्याचा निधी बांधकाम विभागाला वर्ग केल्याने नगरसेवक नाराज असल्याचे चित्र पैठण शहरात पहावयास मिळत आहे. सरकार  भुमरे यांनी आपल्याच पक्षातील शिवसेनेचे ८ नगरसेवकांवर अविश्वास दाखवल्याची चर्चेला पैठण शहरात उधाण आले आहे.

------------------------------------------------------------------------
पैठण शहरहद्दीतील विकास कामे

स्वामी समर्थ मंदिर बांधकाम व सुशोभीकरण ७० लाख, शादिखाना नेहरु चौक ७० लाख, पन्नालालनगर सामाजिक सभागृह १५ लाख, छत्रपती कॉलनी सुशोभीकरण व बांधकाम ५० लाख, दत्त मंदिर डोम १५ लाख, आंबेडकर पुतळा परिसर सुशोभीकरण ४० लाख, भावसार समाज सभागृह १० लाख, गवळी समाज सभागृह ३० लाख, कब्रस्थान २५ लाख, शहरातील विविध रस्ते व विकास कामे सर्व मिळून १२ कोटी ३५ लाख नगर विकास खात्या अंतर्गत निधी मंजूर झाला. वरील सर्व कामे पैठण शहर हद्दीत आहेत. नगर परिषद सक्षम असतांना तरीही निधी बांधकाम विभागाला वर्ग केला म्हणून शिवसेना नगरसेवक नाराज असल्याची चर्चा पैठण शहरात होत आहे ........सरकार भुमरे..... तुमचा आमच्यावर भरोसा नाय काय .........

Post a comment

0 Comments