दिल्लीतल्या वरिष्ठांनी सांगितलं तुम्हाला पक्षात संधी नाही, तुम्ही राष्ट्रवादीत जा; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

मुंबई : गेली ४० वर्षे भाजपला वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन भाजपचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाचं योगदान देणारे भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थित एकनाथ खडसे यांनी पत्नी मंदाकिनी, कन्या रोहिणी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधलं.

यावेळी बोलताना एकनाथ खडसे मोठा राजकीय गौप्यस्फोट केला. खडसे म्हणाले की, भाजप सोडण्यापूर्वी मी दिल्लीतल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी बातचित केली. परंतु ते मला म्हणाले की, तुम्हाला आता पक्षात संधी नाही. तुम्हा राष्ट्रवादीत जा. त्यानंतर मी राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला.

Post a comment

0 Comments