हाथरस व बलरामपूर येथील युवती वर अत्याचार करून तिचा खुन करण्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या आर पी आय ची मागणीआरपीआय चे जिल्हा उपाध्यक्ष सुनील आडसुळ यांनी दिले तहसिलदारांना निवेदन

पैठण प्रतिनिधी विजय खडसन :-

  उत्तर प्रदेशातील हाथरस व बलरामपूर येथील युवती वर अत्याचार करून तिचा खुन करण्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, 
निवेदन निषेध नोंदण्या साठी आज पैठण तहसील कार्यालय येथे पैठण तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी व  हाथरस व बलरामपूर येथील दलित पिडीत युवती वर झालेल्या घटनेचा जाहीर निषेध नोंदवून तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना निवेदन देण्यात आले.

19 वर्षीची मनिषा उत्तर प्रदेशातील हथरत येथे चार गुंडांनी तिच्यावर बलात्कार करून निर्घृण हल्ला केला त्यात ती मरण पावली उत्तर प्रदेश हाथरस येथुन अंदाजे 10किलोमिटर, अंतरावरील आग्रा रस्त्यावर मुख्य रस्त्यापासून दोन किलोमीटर आत, बाजरी आणि धान्य च्या शेता नंतर बुलगढी,गाव लागते दलित मुलीवर झालेल्या अत्याचार सारा देश हादरून टाकणार आहे, करीता निषेध पैठण तहसीलदार कार्यालया येथे दि05/10/2020रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले च्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस व बलरामपूर येथील युवती वर अत्याचार करून तिचा खुन करण्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, 
या मागणीसाठी पैठण तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. या निवेदनावरती सुनिल आडसुल (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष), अमोल भैया नरवडे (मराठवाडा संघटक) ,प्रकाश पवार (मराठवाडा युवा संघटक), मुरलीधर म्हस्के (औरंगाबाद जिल्हा संघटक), जगन्नाथ साळवे (पैठण शहर अध्यक्ष),शिवाजी वाव्हुळ(तालुका अध्यक्ष पैठण), सोमनाथ गायकवाड (तालुका सरचिटणीस), महेंद्र साळवे (सोशल मीडिया निमंत्रक पैठण तालुका) पंकज गायकवाड, संजय केदारे, सुनिल बोर्ड, रमेश निकाळजे, देवा आहिरे,कचरू मगरे, विजय गायकवाड, भीमराज ससाने, राम निकाळजे, संदीप थोरात, अदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत

Post a comment

0 Comments