औरंगाबाद ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ढोरकीन ते बालानगर रस्त्यावर अवैध गुटखा पकडला.
    पैठण तालुक्यातील ढोरकीन ते बालानगर रस्त्यावर विक्रीसाठी जाणारा प्रतिबंधीत अवैध गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री पावणे एक वाजता छापा टाकून १ लाख १४ हजार ४०० रुपयांचा गुटखा व एक इंडिका कार असा एकूण ३ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामुळे अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. 

 ढोरकीन ते बालानगर रस्त्यावर रात्री गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती औरंगाबाद ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली, या माहितीवरुन गुन्हे शाखेच्या पथकाने सदर रस्त्यावर शनिवारी रात्री दबा धरून बसले असता रात्री पावणे एकच्या सुमारास समोरुन एक इंडिका कार (क्र.एम एच २३ एन ५४९४) येताना दिसली तिला थांबविण्याचा इशारा करताच पोलिस असल्याचे बघून कार चालक व अन्य एकजण कार उभी करुन अंधाराचा फायदा घेत पसार झाले. सदर गाडीतून हिरा पान मसाल्याच्या चार गोण्या व राॅयल ७१७ टाॅबकोच्या चार गोण्यासह एक इंडिका कार असा एकूण ३ लाख २९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Post a comment

0 Comments