अंगणवाडी कर्मचारी असोसिएशन च्या वतीने निवेदन

वैजापूर(प्रतिनिधी/ राहुल त्रिभुवन) : 


वैजापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका यांचे मोबाईल दुरुस्ती करण्यासाठी वैजापूर तालुक्यातीलच तालुका समन्वयक नेमण्यात यावा म्हणून  आज दिनांक 12 ऑक्टोबर, अंगणवाडी कर्मचारी असोसिएशन च्या वतीने निवेदन देण्यात आले. वैजापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकाचे मोबाईल  दुरुस्तीसाठी  मोबाईल सर्विस सेंटर हे वैजापूर तालुका येथे देण्यात यावे  व मोबाईल तालुका समन्वक वैजापूर स्थानिक चा घेण्यात यावा  संदर्भात जिल्हा परिषद औरंगाबाद मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले , उपमुख्य कार्यकारी  अधिकारी  प्रसाद मिरकले, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे ,तसेच रामशेटवाड  या सर्वा सोबत चर्चा  करून त्यांना निवेदन देण्यात आले.हे निवेदन  अंगणवाडी कर्मचारी असोसिएशन राज्य उपाध्यक्ष माया म्हस्के, पुष्पा जाधव, मीरा तुपे, अमृता राजपूत, नंदा शेलार यांनी दिले आहे.

Post a comment

0 Comments