खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी आटापिटा, बाळासाहेबांच्या नावाने अजून किती दिवस पोळ्या भाजणार?- चंद्रकांत पाटील

मुंबई : “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अजून किती दिवस पोळ्या भाजणार? खुर्चीसाठी त्यांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या शिकवणीचे पालन करणं तुम्ही विसरला आहात”, असं प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२५ ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात भाजपवर सडकून टीका केली. या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी फेसबुकवर सडेतोड उत्तर दिलं आहे. 
“काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात देशाच्या सर्वोच्चपदी असणाऱ्या लोकांबद्दल अगदी अर्वाच्य भाषेचा उपयोग केला. तुम्ही राज्यप्रमुख आहात, याचा कदाचित तुम्हाला विसर पडला असल्याची प्रचिती काल आली. तुम्ही काल भाषणात पुन्हा एकदा तुमच्या तथाकथित हिंदुत्वाच्या नावाने गाजावाजा केला. मात्र, सत्तेच्या लालसेपोटी सोयीनुसार तुम्ही हिंदुत्वाची व्याख्या बदलत आहात, हे प्रकर्षणाने जाणवत आहे”, असा घणाघात चंद्रकांत पाटलांनी केला.

Post a comment

0 Comments