खडसे तो सिर्फ झाँकी है... भाजपाला आणखी धक्के बसू शकतात..

मुुंंबई दि.२२ गुुुरूवार : भाजपा नेते एकनाथ खडसेंचं महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी खडसेंचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खडसेंचे स्वागत करताना भाजपला पाया ठिसूळ होतोय याचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे.मुंबई - एकनाथ खडसे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. याबाबत अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्यानंतर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर भाजपा नेत्यांनी दुर्दैवी निर्णय असल्याचे म्हटलंय. तर, महाविका आघाडीतील नेत्यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलंय. ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी खडसे तो सिर्फ झाँकी है... असे म्हणत भाजपला धक्का देणार विधान केले आहे. 

Post a comment

0 Comments