मागासवर्गीयांसाठीच्या शासकीय महामंडळांची कर्जमाफी करण्यात यावी - राहुल डंबाळेपैठण पृतिनिधी विजय खडसन - 
पैठण तालुक्यातील बिडकीन येथे मागासवर्गीयांच्या आर्थिक विकासासाठी शासनाने स्थापित केलेल्या सर्वच मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात येऊन त्यांना व्यवसायासाठी नव्याने कर्ज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्ष नेते राहुल डंबाळे यांनी कर्ज अधिकार परिषदेत उद्घाटनपर भाषणाच्या वेळी केली.

रिपब्लिकन युवा मोर्चाच्या 18 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने औरंगाबाद शहर जिल्हा शाखेच्या वतीने बिडकीन रोड येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालया मध्ये कर्ज अधिकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन राहुल डंबाळे यांच्या हस्ते करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष सुवर्णा डंबाळे तर प्रमुख अतिथी माझी आमदार संजय वाकचौरे पॅथर सेनेचे सतिष पट्टेकर  छावा संघटनेचे जिल्हा प्रमुख किशोर शिरवत  आदी मान्यवर सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्रमुख जयकिशन कांबळे यानी केले होते

लॉकडाऊन नंतर सर्व घटकांत सोबतच दलित मागासवर्गीयांची मोठी आर्थिक कुचंबणा झाली असून त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने विशेष उपाययोजना करणे आवश्यक आहे व त्या अंतर्गत शासकीय महामंडळामार्फत होणारा कर्जपुरवठा अधिक सुरळीत व तत्परतेने होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत असतानाच शासनाने नोकऱ्यांमधील मागासवर्गीयांचा शिल्लक अनुशेष देखील तातडीने भरण्याची मागणी डंबाळे यांनी केली.

दरम्यान राज्य सरकार हे केवळ एक जातीय कारभार करत असून बहुसंख्यांक समुदायाच्या दबावाला बळी पडत घटनाबाह्य बाबी करत असताना मागासवर्गीयांच्या हक्काचे व घटनात्मक असणाऱ्या सोयी-सवलती मात्र नाकारत आहे ही अत्यंत चूक आहे. तसेच राज्यातील मराठा समाज बांधवांनी चुकीचा अट्टाहास न करतात पोलीस भरती सह कोणत्याही नोकर भरती विरोध करू नये. जे घटनात्मक असेल ते त्यांच्या वाटेचे त्यांना मिळेलच पण त्यासाठी त्यांनी इतर समाज घटकांना वेठिस धरु नये असे प्रतिपादन रिपब्लिकन युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सुवर्णा डंबाळे यांनी केले.
प्रदेश महासचिव  प्रा.अनिल गवळे, शहर अध्यक्ष सुरज खाजेकर, जिल्हा कार्यध्यक्ष गौतम वाकडे, जिल्हा संघटक भाई अमोन आव्हाड जिल्हा सचिव संजय चाबुकस्वार , गणेश मात्रे , मिलिंद नरवडे, राजेंद्र दोंडे,दिपक घटे आदी उपस्थित होते

Post a comment

0 Comments