शेती पंप ची वीजपुरवठा करणार्‍या तारा चोरीला.


गंगापूर शहराजवळ असलेल्या जयवंत 
लगड , प्रभाकर  राऊत यांच्या शेतातील गट क्रमांक  285  मधील विद्यूत
पुरवठा करणाऱ्या 3 हजार 640 मीटर रुंदीच्या 75 हजार 193 कीमंतीच्या  अॅल्युमिनियमच्या तारा अज्ञात चोरट्यांनी 26 ऑक्टोबर रोजी रात्री चोरून घेऊन 
गेल्याची तक्रार विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभीयंता गोविद  दुसिंगे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिली आहे,
पोलीसाकडुन मिळालेल्या माहितीनुसार
गंगापूर शहरातील जयवंत 
लगड, प्रभाकर  राऊत  यांनी त्यांच्या शेतातील गट क्र 285  मधील विद्यूत
पुरवठा करणाऱ्या खांबावरिल
अॅल्युमिनियमच्या ताराची 
कोणीतरी अज्ञात चोरट्यानी चोरून घेऊन गेल्याचे लक्षात येताच संबंधित शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभीयंता गोविंद दुसिंगे यांना माहिती दिल्यावरुन अभीयंता यांनी या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली असता 3 हजार 640मीटर रुंदीची
 अॅल्युमिनियमच्या तार किंमत
75हजार 193 रुपयांची अज्ञात चोरट्यांनी चोरून घेऊन गेल्याचा गुन्हा 
गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे आता गंगापूर शहरासह तालुक्यात विद्युत तारेची चोरी करणारे चोरटे सक्रिय झाले आहे

Post a comment

0 Comments