मतं देणाऱ्यांनाच कोरोनाची लस देण्याचं आश्वासन म्हणजे भाजपची क्रूरता - संजय राऊत

मुंबई:- बिहारमध्ये NDA सरकार आलं तर बिहारच्या सर्व जनतेला कोव्हिडची लस मोफत देण्यात येईल' अशी घोषणा भारतीय जनता पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात केली आहे.

संपूर्ण देश कोव्हिडच्या आरोग्य संकटाशी लढत असताना भाजपने कोरोनाची लस हा निवडणुकीचा मुद्दा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.भाजपच्या या आश्वासनावर विरोधी पक्षांकडूनही टीका सुरू झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या आश्वासनाला 'क्रूरता' म्हटलंय.

"भाजपचं जिथं सरकार आहे, तिथं कोरोनाची लस मिळणार नाही का? जेपी नड्डा आणि हर्षवर्धन यांनी हे स्पष्ट केलं पाहिजे. मोदी तर म्हणाले होते की, प्रत्येक घरार्यंत लस कशी पोहोचेल, याची यंत्रणा बनवत आहेत. मग आता भाजपनं वेगळी राजकीय यंत्रणा तयार केलीय का? भाजपला मत जाईल, त्यांनाच लस मिळेल का?" असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे

Post a comment

0 Comments