भिल्ल, महादेव कोळी, पारधी,मल्लेरवारलु,या आदिवासी जमातींच्या वतीने पैठण तहसिल समोर ढोलकी बजाव आंदोलन


पैठण (प्रतिनिधी विजय खडसन)--

पैठण येथे तहशिल कार्योलया समोर धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देऊ नये या मागणीसाठी महादेव कोळी, पारधी, भिल्ल, मल्लेरवारलु, या आदिवासी जमातीच्या वतीने पैठण तहसिल समोर ५ ऑक्टोबर रोजी ढोलकी बजावो आंदोलन करण्यात आले. सद्य परिस्थितीत संपुर्ण महाराष्ट्र राज्यात धनगर समाज एसटी  (अनुसुचित जमाती) या प्रवर्गातुन आरक्षणाची मागणी करत आहे. त्यासाठी ते वारंवार आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधीत आहेत. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण दिल्यास खऱ्या आदिवासींना त्यामुळे फार मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. आदिवासी समाज आजही जुन्या पारंपरिक रीतीने पर्यावरणाचा समतोल राखत दऱ्या खोऱ्यात, नदी नाल्यात राहून जीवन जगत आहे. आज ही एसटी प्रवर्गातील लाखो युवकांना शिक्षण नाही, त्यामुळे कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे आजही अनेक युवक नोकऱ्या पासून वंचित आहेत. असे असताना जर  धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण दिल्यास खऱ्या आदिवासींचे अतोनात नुकसान होईल व हा खरा आदिवासी समाज परत रसातळाला जाईल त्यामुळे धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देऊ नये. असे निवेदन वीर एकलव्य आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने प्रदेशाध्यक्ष अशोक बरडे याच्या नेतृत्वात पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके  यांना निवेदन देण्यात आले. 

आदिवासींना खावटी कर्जाचे तात्काळ वाटप करावे. शबरी घरकुल योजनेचा लाभ लाभार्थ्यांना त्वरित देण्यात यावा. आदिवासींना जात प्रमाणपत्र व रेशनकार्ड तात्काळ देण्यात यावे.आदिवासींच्या असलेल्या स्मशानभूमीची नोंद सातबाऱ्यावर घेण्यात यावी. जातपडताळणी समिती बरखास्त करून उपविभागीय अधिकारी यांना जात पडताळणीचे अधिकार देण्यात यावे. आदी मागण्यासाठी पैठण तहसील समोर ढोलकी बजावो आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात एकलव्य आदिवासी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अशोक बरडे, पैठण तालुका अध्यक्ष छोटुभाऊ मोरे, कोळी महादेव समाजाचे तालुकाध्यक्ष अशोकराव मोरे इत्यादी नेते व बहुसंख्येने आदिवासी समाजाचे लोक उपस्थित होते.

Post a comment

0 Comments