डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉ.शाम शिरसाठ



 
औरंगाबाद, दि.३० :  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी प्राचार्य डॉ.शाम शिरसाठ
यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी सदर नियुक्ती केल्याचे पत्र विद्यापीठास बुधवारी (दि.२८) प्राप्त झाले असून कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

    मूळचे फुलंब्री (जि.औरंगाबाद) येथील  रहिवासी असलेले डॉ.शाम शिरसाठ हे सध्या विवेकानंद महावि़द्यालयात प्राचार्यपदी कार्यरत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागातून तीन वर्षापुर्वी
प्राध्यापकपदावरुन  त्यांनी धारणाधिकार (लिन) घेतला आहे. लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तसेच विद्या परिषदेचे सदस्य म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. डॉ.प्रविण वक्ते यांच्याकडून प्रकुलगुरुपदाची सुत्रे ते लवकरच स्विकारणार आहेत. यापूर्वी डॉ.अशोक तेजनकर यांनी (२६ फेब्रुवारी २०१८ ते ३ जून २०१९ ) या दरम्यान काम पाहिले आहे.तर डॉ.प्रवीण वक्ते हे ६ ऑगस्ट २०१९ पासून प्रभारी प्रकुलगुरुपदावर कार्यरत आहेत.  दरम्यान, प्रकुलगुरुपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ.शिरसाठ
यांचे विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने कुलसचिव डॉ.जयश्री सुर्यवंशी यांनीही अभिनंदन केले आहे.

Post a comment

0 Comments