सोलापुरात भाजप महिला मोर्चाचं महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आंदोलन.

दि, १२ . सोमवार - महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस मिहिलांवर बलात्कार,अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहेत.
 कोरोना काळात तर कोविड सेंटर मध्येच महिलांवर अत्याचार झाल्याचे प्रकार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात दिसून आले, याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी आज राज्यभर भाजपा महिला मोर्चकडून जनआक्रोश आंदोलन करण्यात येत आहे. सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज भाजप महिला मोर्चाकडून ठाकरे सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. 
"उद्धवा जागे व्हा" अशी साद ही यानिमित्ताने भाजपा महिला मोर्चकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घालण्यात आली. अशी प्रतिक्रिया महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली.
Post a comment

0 Comments