मराठा आरक्षणा वरील स्थगिती हटविण्या साठी शिवक्रांती सेनेचे बोर दहेगाव येथे जलसमाधी आंदोलन


वैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) : 


सर्वोच्च न्यायालयात राज्यसरकारने मराठा आरक्षणाबाबत योग्य पद्धतीने बाजू न मांडल्या चा आरोप करत शिवक्रांती सेनेच्या वतीने  बोरदहेगाव मध्यम प्रकल्पात ता.०५ रोजी ११ वाजेच्या सुमारास जलसमाधी आंदोलन करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बोरदहेगाव मध्यम प्रकल्पावर नागरिकांची मोठी गर्दी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.शिवाय आंदोलनाच्या अनुषंगाने होणाऱ्या गर्दीमुळे या गाव परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावरिल वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता वापरण्याच्या नागरिकांच्या मूलभूत अधिकाराला अडचण निर्माण होऊ नये व बोरदहेगाव मध्यम प्रकल्प व परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी यापरिसरात सोमवारी सकाळी ६ ते १२ वाजेपर्यंत कलम १४४ लागू करण्याचे आदेश ता.०४ रोजी निर्गमित केले होते.
ठरलेल्या नियोजित वेळेच्या अगोदर गनिमी काव्याने  एक मराठा लाख मराठा घोषणा देत पाण्यात उतरून जल समाधी घेण्या अगोदर पोलीसांनी आंदोलकाना ताब्यात घेतले यात शिवक्रांती सेनेचे  संस्थापक अध्यक्ष संजय सावंत, 
सुनील बोडखे शिवक्राती सेना प्रदेश अध्यक्ष, सोमनाथ मगर प्रदेश कार्यअध्यक्ष, यांच्या सह विक्रम शिंदे, दादासाहेब घायवट भगवान मगर यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे यावेळी पोलीसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता.  यावेळी घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे , उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल, संदीप गावित, तहसीलदार निखिल धुळधर, नायब तहसीलदार महेंद्र गिरगे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद आधाव,पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी,पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर,वेलगुडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या सह दंगा काबू पथक, गोपनीय शाखेच्या पथका सह वाहतूक शाखेचे पोलीस व १०० ते १५० कर्मचा-याचा पोलीस फौजफाटा घटनास्थळी उपस्थित होता.

Post a comment

0 Comments