मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांना सडेतोड उत्तर देतील: अरविंद सावंत

मुंबई : शिवसेनेसाठी महत्वाचा असणारा दसरा मेळावा यावर्षी कोरोनामुळे शिवतीर्थावर होणारा मेळावा सावरकर स्मारकात होत आहे. गेल्या सहा महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जे भोगलं ते महाराष्ट्रानं पाहिलं आहे. महाराष्ट्र,  महाविकास आघाडी सरकार, उद्धव ठाकरे, शिवसेना, आदित्य ठाकरे आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. उद्धव ठाकरे त्यांचे काम करत राहिले आज मात्र पक्षप्रमुख म्हणून ते राजकीय भाष्य करतील आणि विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर देतील, असं शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले आहेत. 

यंदाच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला विशेष महत्व आहे. कारण ठाकरे घराण्यातील पहिले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बनले आहेत. शिवाजी पार्क मधील दसरा मेळाव्यात वेगळी मजा आणि ऊर्जा असते पण यंदा कोरोनाची स्थिती पाहता हे शक्य नाही. मुख्यमंत्री स्वतः कोरोना बाबत नियम करत आहेत. मग ते स्वतः कसे मोडणार त्यामुळे सावरकर स्मारकात यंदा दसरा मेळावा होत आहे. मुख्यमंत्र्यांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान सुरू केले आहे. त्यामुळे ५० लोकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे.

Post a comment

0 Comments