मुंबई : सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत जीवघेणा स्टंट करणाऱ्या तरुणालाही पोलिसांनी कांदिवलीतून ताब्यात घेतलं आहे. नोमन डिसोजा असं या तरुणाचं नाव असून तो पश्चिम उपनगरातील कांदिवली परिसरात राहतो. नोमनसह हा व्हिडीओ बनवणाऱ्या त्याच्या अन्य दोन साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा परिसरात असलेल्या जय भारत या एसआरए इमारतीत गेल्या आठवड्यात हा व्हिडीओ तयार करण्यात आला होता. या व्हायरल व्हिडीओची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी अधिक तपास करत ही कारवाई केली आहे.
.
0 Comments