दौंड मधील वाळुमाफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरवात

(निलेश जांबले) दौंड,पुणे दि.७:- पुण्यात नवनिर्वाचित जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी कार्यभार घेताच दौंड तालुक्यातील वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात झाली आहे...
मागील महिन्यात २९ सप्टेंबर रोजी दौंड चे आमदार राहुल कुल यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख यांच्याशी तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करत दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये होणाय्रा अवैध वाळू उपशाला मुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असुन तालुक्यातील रस्त्यांची चाळण होते आहे तेव्हा महसूल विभागाने कारवाई करुन अवैध वाळू उपशाला लगाम घालावा अशी मागणी केली होती.
तद्नतर दौंडच्या महसूल प्रशासनाला खडबडून जाग आली असुन आज पुन्हा मा. तहसीलदार सो दौंड  संजय पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख निवासी नायब तहसीलदार सचिन आखाडे, मंडळ अधिकारी अजित मोहिते,सुनील जाधव,विजय खरतोडे तसेच देऊळगाव राजे,दौंड,वरवंड मंडळातील  तलाठी यांनी आज (दि०७) रोजी खोरवडी, धुमाळ फाटा, देउळगाव राजे येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या ०७ फायबर व ४ सेक्शन असे एकूण ११ यांत्रिक बोटी नष्ट करत मोठी कारवाई केली आहे...
अशा मोठ्या कारवाई मुळे अवैध वाळू उपसा करण्याय्रा माफियांचे धाबे दणाणले असुन वाळू माफियांनी आपल्या वाळू उपसा करण्याय्रा यंत्रणा इतरत्र हलविल्या आहेत

Post a comment

0 Comments