माजी खासदार केशर काकू क्षिरसागर यांची प्रेरणा घेऊन महिलांनी घरा बाहेर पडत आपले कर्तुत्व सिद्ध केले - गणेश पवार यांचे प्रतिपादन


औरंगाबाद,( प्रतिनिधी ) लोकनेत्या कर्मयोगीनी स्व.केशर काकू क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकाळात कष्टकरी सर्व सामान्यांच्या मुलांनी शिक्षण घेऊन उच्च पदावर विराजमान व्हावे या करिता बीड जिल्ह्यात शिक्षण संस्था उभारून कष्टकरांच्या पाल्यांना प्रवाहात आणणयाचे काम केलं माजी खासदार केशर काकू क्षिरसागर यांच्या पुण्यतिथी निमित्त शहागंज येथील प्रल्हाद पवार यांच्या शिव शक्ती निवास्साथानी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी ते बोलत होते.पुढे  बोलतांना ते म्हणाले की
ज्या काळी महिला घरा बाहेर पडत नसे त्या काळात केशर काकूंनी घरा बाहेर पडून विविध    क्षेत्रात भरारी घेतली त्यांची प्रेरणा घेऊन इतर महिलांनी घरा बाहेर पडत आपले कर्तुत्व सिद्ध केले आहे.सरपंच,आमदार तीन वेळा खासदार म्हणून त्यांनी आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडलेली आहे.केशर काकूंचे विचार महिलांच्या प्रगतीचा मार्ग ठरला आहे.अशा भावना अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे युवक आघाडीचे राष्ट्रीय कार्य अध्यक्ष गणेश पवार यांनी केशर काकूंना अभिवादन करून व्यक्त केल्या.प्रारंभी जेष्ठ समाज सेवक प्रल्हाद पवार यांच्या शुभ हस्ते केशर काकू क्षिरसागर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते.तेली समाजाचे नेते कचरू वेळंजकर यांनी आपल्या भावना व्यक्त करून केशर काकूंच्या कार्याची माहिती दिली.या वेळी जेष्ठ समाज सेवक किशोरसेठ हिरे,कचरू वेळंजकर,गणेश पवार,सुनिल क्षिरसागर,अतुल सोनवणे,श्रीकूष्णा ढोंबळे,संतोष पवार,चंदशेखर पवार,योगेश क्षिरसागर,विशाल मिसाळ,शुभम दहिवाल,आदींची उपस्थिती होती.
संतोष पवार,चंदशेखर पवार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.युवा जिल्हाअध्यक्ष सुनिल क्षिरसागर यांच्या पुढाकारातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अखिल भारतीय तैलिक साहू महासभा राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री श्री.जयदत्त (अण्णा) क्षिरसागर,व युवक आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष श्री विजयभाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील युवकांना संघटीत करण्याचा या वेळी गणेश पवार यांनी संकल्प व्यक्त केला आहे.

Post a comment

0 Comments