कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात, ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही का?, नारायण राणेंचा सवाल

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातील भाषणात राज्यात केलेल्या कोणत्याही कामाचा उल्लेख नाही. ना शेतकऱ्याचा उल्लेख ना, राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल ते बोलले नाही. कोरोनावर तर ते बोलले नाहीत. कोरोनामुळे  देशातील सर्वात जास्त ४३ हजार रुग्णांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला. इतके रुग्ण मृत्यूमुखी पडले. याची जबबादारी मुख्यमंत्र्यांची नाही का?, असा सवाल भाजप खासदार नारायण राणेंनी केला आहे. 

नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादानं शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले. मोदींच्या नावानं मत मागितली म्हणून ५६ आमदार निवडून आले, त्यांचे नाव घेतले नसते तर सेनेचे २५ आमदार देखील निवडून आले नसते. हिंदुत्वाला मुठमाती देऊन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद मिळवलं, अशी टीका नारायण राणेंनी केला.

Post a comment

0 Comments