शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे निधन

पुणे:- अणुऊर्जा क्षेत्रातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर (८९) यांचे गुरुवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी वासंती, विवाहित कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
पदार्थविज्ञान व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विषयातील पदवी व न्यूक्लिअर फिजिक्स या विषयातील पदव्युत्तर पदवी व पीएचडी केलेल्या गोवारीकर यांनी १९५५ मध्ये आपल्या वैज्ञानिक कार्याचा प्रारंभ केला. ट्रॉम्बे येथील अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट येथे ते संशोधन करीत होते. त्यानंतर विशेष संशोधन व अभ्यासासाठी ते बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे तीन वर्षे संशोधन सहायक म्हणून काम केले. त्या संशोधनाचे पेटंट त्यांना मिळाले होते. १९६१ मध्ये ते परत अॅटोमिक एनर्जीमध्ये रुजू झाले.
डॉ. होमी भाभांकडूनही झाले होते कौतुक
भारताचा पहिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक आयसोटोप सेपरेटर विकसित करण्याची जबाबदारी गोवारीकरांवर होती. त्यांच्या हुशारीचे डॉ. होमी भाभांनी कौतुक केले होते. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा टेक्सासमध्ये संशोधनासाठी गेले. परतल्यानंतर त्यांच्यावर केंद्राने विविध जबाबदाऱ्या सोपवल्या.

Post a comment

0 Comments