मात्र सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितल्याने डबेवाल्यांचा हिरमोड झाला आहे.
मुंबईच्या डबेवाल्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने डबेवाल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी दिली आहे. मात्र लोकलमधून प्रवास करण्यासाठी डबेवाल्यांना मुंबई पोलिसांनी दिलेला क्युआर कोड असणे बंधनकारक असणार आहे. तरच एमएमआरमध्ये लोकलमध्ये डबेवाल्यांना प्रवेश मिळणार आहे.
डबेवाल्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, लोकलने प्रवास करण्याबाबतचा कोणताही जीआर आमच्याकडे आलेला नाही. ज्यावेळी हा जीआर येईल तेव्हा डबेवाल्यांनी क्युआर कोडसाठी अर्ज करावा, असा सल्ला रेल्वे अधिकाऱ्यांनी दिला आहे.
0 Comments