अलिबागेत काँग्रेसची निदर्शने , कृषी विषयक धोरणांचा विरोध , हाथरस बलात्कार घटनेचा निषेध


रायगड- केंद्र सरकारच्या नवीन कृषी विधेयकातील शेती आणि शेतकरी विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी तसेच उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार घटनेचा निषेध करण्यासाठी आज रायगड जिल्हा काँग्रेस तर्फे अलिबाग  एस. टी. स्टँड येथे निदर्शने करण्यात आली . यावेळी केंद्रातील मोदी सरकार व योगी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली . जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माणिक जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी , कार्यकर्ते सहभागी झाले होते . कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी झालेल्या वर्तणुकीचाही यावेळी निषेध करण्यात आला .
प्रतिनिधी सुरेश शिंदे सह मराठा तेज रायगड

Post a comment

0 Comments