मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवा अन्यथा अधिकाऱ्यांना खड्ड्यात गाडू मनसेचा इशारा


रायगड

सध्या मुंबई गोवा महामार्गावर खड्डे आणि धुळीचे साम्राज्य पाहायला मिळत असून अनेक ठिकाणी अक्षरशः महामार्गाची चालण झाली असून संपूर्ण महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे लहान मोठया बाईक स्वारांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे अवजड वाहाने भरमसाट वेगाने निघून जातात आणि त्यांच्या मागे प्रवास करणाऱ्या बाईकस्वार धुलीकणा मुले आपले डोळे मिटावे लागतात अशा परसस्थित अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर आज रायगड जिल्ह्यातील  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाड मधील कार्यरत असणाऱ्या एल एन टी कंपनीला निवेदन देण्यात आले जर एल एन टी कंपनीने महामार्ग वेळेवर दुरूस्त केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन केले जाईल आणि मग माञ एल एन टी कंपनीचे अधिकारी रसत्यावर दिसले तर त्याच खड्ड्यात अधिकाऱ्यांना गाडू असा इशारा मनसे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष चेतन उत्तेकर यांनी दिला आहे यावेळी मनसे दक्षिण जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड, उप जिल्हा अध्यक्ष चेतन उत्तेकर,महाड तालुका अध्यक्ष संतोष पार्टे, पोलादपुर तालुका अध्यक्ष दर्पण` दरेकर महाड शहर अध्यक्षा प्रतीक्षा कुलकर्णी त्याच प्रमाणे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते  उपस्थित होते

Post a comment

0 Comments