नवरात्रीच्या चौथ्या दिवसाच्या रंगाचं महत्व.


औरंगाबाद( योगिता बनसोडे):- नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगांना महत्त्व असते. आपण नेहमी पाहतो की आपल्या आजूबाजूला अगदी पहिल्या दिवसापासून ते नवव्या दिवसापर्यंत ठराविक रंगांना महत्त्व असते.
मूळ रंग आणि त्याचे महत्त्व हे देवीच्या आवडीनुसार असल्याचे म्हटले जाते. गेल्या दशकापासून ही प्रथा जास्त प्रचलित झाली आहे. एकाच रंगाची वस्त्र परिधान केल्याने एकोपाचा संदेश देण्यात येतो अशी यामागची भावना आहे. 
दुर्गा देवीच्या तिसऱ्या शक्तींचं नाव आहे. चंद्रघंटा आणि तिसऱ्या दिवशी या देवीच्या पूजेला अत्याधिक महत्त्व आहे. या दिवशी विग्रह पूजन आणि आराधना करण्यात येते. मणिपूर चक्रामध्ये प्रविष्ट होण्यासाठी भक्त या देवीची आराधना करतात. 
देवी चंद्रघंटेच्या कृपेने अलौलिक शक्तीचे दर्शन मिळते, तसेच दिव्यदृष्टींचा अनुभव घेता येतो असे सांगण्यात येते. या देवीची पूजाअर्चा करताना दिव्य ध्वनी ऐकायला येतात असंही सांगितलं जातं. या देवीचा आवडता रंग आहे लाल. आयुष्यात आनंद आणि उत्साह येण्यासाठी आणि भक्तीरसात राहण्यासाठी या लाल रंगाचं महत्त्व जाणलं जातं. त्यामुळे या देवीला लाल रंग प्रिय आहे. म्हणून या तिसऱ्या दिवशी लाल रंगाची वस्त्र परिधान करावीत असं सांगितलं जातं.
या देवीच्या कपाळाचा आकार हा अर्धचंद्राप्रमाणे असल्यामुळेच या देवीला चंद्रघंटा देवी नावाने ओळखलं जातं. लाल रंग हा पराक्रमाचं प्रतीक आहे आणि म्हणूनच या देवीला हा रंग प्रिय असल्याचे समजण्यात येते.


Post a comment

0 Comments