त्या परप्रांतीय महिलेचा खून की आत्महत्या.?गंगापूर(प्रतिनिधी( प्रकाश सातपुते )

गंगापुर तालुक्यातील लासुर स्टेशन येथून जवळ असणाऱ्या गाजरमळ्यात शेतात मोलमजुरी करण्यासाठी परप्रांतीय कुंटुंबे आलेले आहे आज अंदाजे एका सगिता प्रकाश बिलावेत वय वर्ष 28 महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली .यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित,शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर,पोलीस उपनिरीक्षक सतिष दिंडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घेऊन पंचनामा केला व सदर माहिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लासुर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला.
                       सदर महिलेले एक सहा वर्षाची मुलगी व सात वर्ष वयाचा मुलगा असून ती पतीसह गाजरमळा याशिवारात हे कुटुंब महिनदारीवर जनार्दन गवळी यांच्या येथे शेतात मोलमजुरी करून पोट भरत होते या घटनेबाबत सदर मृत महिलेच्या पती प्रकाश बिलावेत याला विचारले असता त्याने संगीतले की माझ्या पत्नीला फिट या आजाराचा त्रास होता व रात्री तसाच प्रकार झाल्याने ती जमिनीवर आपटल्याने मृत्युमुखी पडल्याचे सांगितले मात्र परिसरात सदर महिलेच्या पतीने गळा आवळून खून केल्याची कुणकुण होती व यावरून परिसरातील शेतकरी धास्तावले  असून याबाबत शिल्लेगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद दाखल असून सदर प्रकरणाचा अधिक तपास शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पिआय रविंद्र खांडेकर हे करत आहे.

Post a comment

0 Comments