अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र व पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ताप येत असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांची प्रकृती ठणठणीत झाल्याने गुरुवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांना अचानक ताप आला होता. यानंतर त्यांची कोरोना आणि मलेरिया टेस्टही झाली होती. या दोन्ही टेस्ट नेगेटिव्ह आल्या होत्या. यानंतरही त्यांचा ताप जात नसल्यामुळे खबरदारी म्हणून अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Post a comment

0 Comments