लोकल प्रवासासाठी खोटे ओळखपत्र, अनेकांवर गुन्हे, रेल्वे पोलिसांची कारवाई

मुंबई :  लोकल ट्रेन मध्ये सध्या फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या आणि शासनाने मंजूर केलेल्या सेवेतील प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा दिली आहे. मात्र. काही जण खोटे ओळखपत्र बनवून प्रवास करत आहेत. अशा प्रवाशांवर रेल्वेने कारवाई केली असून त्यांना अटक केली आहे.

एका नागरीकाने सरकारी कर्मचाऱ्याच्या वेषातील खोटा फोटो लावून खोटे ओळखपत्र बनवले आहे. फक्त रेल्वेतून प्रवास करता यावा म्हणून या व्यक्तीने हा उपादव्याप केला आणि खोटे ओळखपत्र बनवले.

कल्याणहून मुंबईकडे प्रवास करताना योगेंद्र महेंद्र मिरसा या आरोपीला ठाणे येथे अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारची कारवाई मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सुरु असून अनेक जणांवर कारवाई होत असून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत.

Post a comment

0 Comments