प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या औरंगाबाद जिल्हा प्रवक्ता पदी राहुल त्रिभुवन


 औरंगाबाद( प्रतिनिधी) : 

औरंगाबाद  जिल्ह्यात व  वैजापूर शहरात तसेच ग्रामिण भागात शैक्षणिक तथा पञकारीतेत कार्यरत असणारे मुक्त व निर्भिड पञकार राहुल अशोक त्रिभुवन यांची प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा अध्यक्ष विष्णु आष्टीकर, मराठवाडा कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, जिल्ह्याध्यक्ष सतिश लोखंडे व औरंगाबाद जिल्हा संघटक किरण पाटील बारगळ यांच्या शिफारशीनुसार राहुल त्रिभुवन यांना औरंगाबाद जिल्हा प्रवक्ता म्हणून संस्थापक अध्यक्ष श्री डी. टी. आंबेगावे यांनी निवड केली आहे.राहुल त्रिभुवन हे शैक्षणिक, सामाजिक ,पञकारीता, कला आदी क्षेत्रात कार्यरत असून गुणवत्ता आणि कार्यक्षमता पाहून त्यांची नियुक्ती केली आहे.या निवडीबद्दल जिल्हाअध्यक्ष,संस्थापक अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a comment

0 Comments