कल्याण परिसरात ड्रग्ज माफियांची टोळी सक्रिय,तक्रार करणाऱ्यावर जीवघेणा हल्ला
कल्याण- कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात ड्रग्ज माफियांविरोधात तक्रार केली म्हणून सामाजिक कार्यकर्त्यावर ड्रग्ज माफियांनी प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे.

बैलबाजार परिसरात राहणारे आमीर खान यांनी ड्रग्ज माफियांच्या विरोधात आवाज उठवत त्यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली होती तसेच चार वर्षांपूर्वीदेखील बैलबाजार परिसरातील कुख्यात ड्रग्ज माफिया रहमत पठाण विरोधात अमीर खान यांनी तक्रार केली होती. वारंवार आमीर खानकडून केल्या जाणाऱ्या तक्रारीमुळे ड्रग्ज माफियांचा धंदा गोत्यात आला होता. हे सर्व सुरु असताना आमीर खान रात्रीच्या वेळी आपल्या घराचा जीना चढत असताना काही अज्ञात लोक त्यांच्या जवळ आले व त्यांनी खान यांच्या तोंडावर कपडा टाकून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या प्राणघातक हल्यात ते बेशूद्ध होऊन खाली कोसळले. हल्लेखोर त्यांना मयत समजून तेथून पसार झाले.

मात्र, परिसरात एका ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीत एक आरोपी कैद झाला. या आरोपीची ओळख पटल्याने पोलिसांना सर्व बाब लक्षात आली व त्यानुसार महात्मा फुले चौक पोलिसांनी चौकशी करून याप्रकरणी आतापर्यंत आरोपी बबन वाणी, इर्शाद शेख, भूषण मोरे आणि संजय सिंग यांना अटक केली आहे.

Post a comment

0 Comments