एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार - जयंत पाटील

मुंबई:- एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. शुक्रवारी त्यांचा प्रवेश होईल असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचं स्वागत केलं आहे.शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात त्यांचा प्रवेश होणार आहे.खडसेंवर भाजपमध्ये अन्याय झाला आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. एकनाथ खडसे पक्षात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढेल, असंही पाटील यांनी म्हटलंय.खडसे यांनी पक्षात येण्यासाठी कुठलीही अट ठेवली नसल्याचं पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलंय.

Post a comment

0 Comments