औद्योगिक क्षेत्रात विविध समस्यांमुळे वाळुजकर झाले त्रस्त.औरंगाबाद ,वाळूज औद्योगिक वसाहत क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात विविध समस्या मुळे औद्योगिक वसाहत क्षेत्रांमधील नागरिक त्रस्त झाले आहेत अनेक वेळा मागणी करून या विविध समस्यांकडे औद्योगिक विकास महामंडळ कार्यकारी अभियंता दुर्लक्ष करीत असल्याचे समोर येत आहे.
    औरंगाबाद वाळूज औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात समस्यात वाढ झाली आहे.औद्योगिक क्षेत्रातील लॉकडाऊन नंतर पूर्ववत सुरू झाले आहेत सध्या दिवाळी संण तोंडावर असल्यामुळे दुचाकी,तीनचाकी, व चारचाकी वाहनांची मागणी वाढल्याने मोठ्या प्रमाणात उद्योग 24तास सुरू आहे त्यामुळे कामगार व तसेच कर्मचारी यांना ये-जा त वाढ झाली आहे. औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्त्यांची चाळणी झाली असून पथदिवे बंद आहे यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे देखभाल अभावी पथदिवे अनेक महिन्यापासून बंद पडले आहे. कामगारांना याचा त्रास होत आहे. कामगारांची रात्री-अपरात्री या भागातील गुंड लूट करीत आहे. कामगारांना मारहाण करण्याच्या घटना देखील या भागात घडत आहे. कामगार चौक ते के सेक्टर इंडोंरस ग्रुप रोड, पंढरपूर चौक ते सिएट रोड वर पावसाच्या पाणी साचल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत या ठिकाणी रोज छोट्या-मोठ्या अपघातांचे सत्र सुरूच आहे रांजणगाव फाटा ते बजाज बिहार, रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने वाहनधारक व नागरिकांना याचा त्रास होत आहे यासंदर्भात नागरिक तसेच कंपनीतील अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून दुरुस्ती होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. या विविध समस्यांचे निवेदन नागेश कोठारे यांनी औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.
आता बघण्याचा विषय आहे या भागातील कामगार ,अधिकारी व नागरिकांना होणाऱ्या त्रास कधी संपणार आहे.

Post a comment

0 Comments