खड्डे भरण्याच्या भ्रष्टाचारात केडीएमसी देशात पहिल्या क्रमांकावर आहे- भाजप आमदार गणपत गायकवाड

मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत. पावसाळा संपला तरी खड्डे भरण्याचे काम केले जात नाही. खड्ड्यांमुळे एका दिवसात तीन जण जखमी झाले. यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनावर घणाघाती टिका केली आहे.

सातत्याने तक्रार करुनही रस्त्यावरील खड्डे भरले गेले नाहीत. खड्डे भरण्यासाठी खडी व मातीचा वापर केला. त्यात डांबराचा पत्ताच नाही. खड्डे भरण्याचे नियम पाळले जात नाहीत. खड्डे आणि रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे अपघात होत आहेत. महापालिकेच्या भ्र्ष्टाचारामुळे नागरिकांचा जीव जात आहे. खड्ड्यांच्या भ्रष्टाचारात कल्याण डोंबिवली महापालिकेचा देशात पहिला नंबर लागतो, अशी टिका आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे

Post a comment

0 Comments