बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या निष्क्रियतेमुळे घडताहेत अपघात....बारामती - उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती यांचे कामकाज मागील कित्येक दिवसापासून आर्थिक तडजोडी करत सुरू आहे... नियमबाह्य व ओहरलोड वाहतुकीसाठी मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडून कार्ड स्वरूपात खाजगी एजंट मार्फत ३५०० ते ७००० रुपये पर्यंत रक्कम स्वीकारली जात असून, याच आर्थिक तडजोड पोटी पालखी महामार्ग खड्डेमय झाला आहे.या वाहतुकीस परिवहन विभागाचे अधिकार्यांच्र्या वरदहस्तामुळे बारामती पाटस संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे... या महामार्गावरील नियमबाह्य वाहतूक थांबवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग दौंड स्थानिक ग्रामपंचाय यांच्याकडून लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केला आहे, मात्र परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यास रद्दीचं गाठोड दाखवला आहे...तर दगड खाण व्यवसायिकांनकडुन गौण खनिज वाहतूक करताना सर्व नियम धाब्यावर बसवल्याचे दिसत आहे. त्यामुळे या गौण खनिज वाहतूक करतानाय्रा वाहनांवर कारवाई करण्यास परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनाच्या हाताला लकवा भरलाय आहे की काय असा सवाल स्थानिक नेहमीच विचारत आहेत...
तर बारामती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी खासगी तीन इसम नेमुन आपलं आर्थिक कलेक्शन सुरू ठेवले आहे,अशी माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली आहे...
बारामती पाटस महामार्गावरील नियमबाह्य वाहतूक पुर्णपणे परिवहन विभागाने त्वरीत  थांबववी अन्यथा आगामी काळात प्रहार संघटनेच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचे आंदोलन परिवहन कार्यालयासमोर छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे...


प्रतिनिधी निलेश जांबले

Post a comment

0 Comments