सोयगाव येथील बनोटी परिसरातील हिवरानदी पात्रातून अवैध वाळु उपसा जोरात ; महसूल विभाग कोमात तालुका प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्षसोयगाव तालुक्यातील बनोटी परिसरातील हिवरा नदीच्या पात्रातून शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडवीत दररोज शेकडो ब्रॉस वाळू उपसा ट्रेकटरद्वारे होत असून ठिकठिकाणी वाळू माफियांकडून वाळू साठे करण्यात येत आहेत.याप्रकरणी तालुका प्रशासन अर्थपूर्ण व्यवहारातून वाळूसाठे व वाहतूक करणारे वाहनावावर कारवाई करीत नसल्याने जनतेत नाराजीचा सूर उमटत आहे.
सोयगाव तालुक्यातील बनोटी परिसरात माहे सप्टेंबर मध्ये दोन वेळा अतिवृष्टीचा पाऊस झाला होता.त्यामुळे हिवरा नदीला दोन  महापुर येऊन गेले.या दोन्ही महापुरात हिवरा नदीच्या पात्रात हजारो ब्रॉस वाळु  साचली आहे.यात अवैद्य वाळू माफियांचे फावले असून बनोटी परिसरातील दहा ते बारा ट्रक्टर रोज साठ ते सतर ब्रॉस वाळु वाहतूक करीत आहे.
वाहतूक केलेली वाळू बनोटी-वाडी,बनोटी- पळाशी, व बनोटी- मुखेड रस्त्यावर साठे करून आहे.
तसेच बांधकामासाठी परिसरातील व बनोटीतील अनेक घरासमोर खुलेआम टाकण्यात येत आहे.
 काही राजकीय पुढारी,प्रशासनातील अधिकारी व एलसिबी पोलीसांच्या संगनमताने हा अर्थपूर्ण गौरखधंदा सुरू असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका वाळू माफियाने दिली.
बनोटी परिसरातील हिवरा नदीतून ट्रक्टरद्वारे वाळुचोरी करणाऱ्याची एक साखळी काही महिन्यापासून क्रियाशील झाली आहे. जवळपास दहा ते बारा ट्रक्टर असलेल्या वाळू माफियांचे जागोजागी पेरलेले विस ते तीस  लोकेशन पंटर हे खुलेआम सामूहिक वाळुचोरीचा गोरखधंदा करत आहे.
अक्षरशा हिवरा नदीच्या पात्रात  वाळू माफिया ट्रक्टर गँग वाळू ओरबाडुन काढत आहे.त्यामुळे नदीपात्राची दिशा बदलून हिवरा नदीचे पाणी गावात घुसून गावातील घरे व दुकाने वाहून मोठे नुकसान होत आहे.  पोलीस व महसूल प्रशासनाने मात्र या वाळुमाफियांच्या अर्थ`पूर्ण व्यवहारातून डोळेझाक करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
त्यामुळे भल्या पहाटे पासुन रात्रभर वाळु उत्खनन सुरू आहे. हिवरा नदीतून मुखेड,तिडका,पळाशी, वाडी, या रस्त्यावर सुसाट वाळूचे ट्रक्टर धावताणा दिसून येत असताना आता मात्र दिवसभर सुसाट वाळु हिवरा नदीतून चालू आहे,


Post a comment

0 Comments