खडसेंच्या प्रवेशानंतर अनिल गोटे आशावादी, भाजपवासी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत परतण्याचे आवताण

धुळे : भाजपमध्ये मिळणाऱ्या वागणुकीमुळे नाराज असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्यापूर्वी धुळ्यातील नेते अनिल गोटे यांनीही भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. आता हे दोन्ही नेते मिळून उत्तर महाराष्ट्रात काय राजकीय बदल घडवून आणतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येणाऱ्या काळात सत्तांतर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी एक पत्रक काढून भाजपात गेलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. सध्या हे पत्रक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.

Post a comment

0 Comments