स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची प्रकृती बिघडली.

पुणे:- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे स्वीय सहायक स्वस्तिक पाटील यांनी गुरुवारी याची पुष्टी करत सांगितले की, शेट्टी यांच्या पायाला सुज आल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्वस्तिक पाटील यांनी सांगितले की, "राजू शेट्टी नियमित तपासणीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेले होते. त्यांना अस्वस्थ वाटत होते, यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला."
दरम्यान राजू शेट्टी यांनी रुग्णालयातून एक निवेदन जारी करत म्हटले की, "माझ्या शुभचिंतक, कार्यकर्ते, समर्थक आणि कार्यकर्त्यांनी काळजी करू नये. माझी प्रकृती स्थिर आहे. मी लवकरच बरा होऊन तुमच्यात येईन."

Post a comment

0 Comments