महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाला कार्यालय उपलब्ध करून द्या मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्याकडे केली मागणीपैठण (प्रतिनिधी विजय खडसन:)--| महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ हा संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहे . तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या पत्रकारांना बसण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी पत्रकार संघाला जागा कार्यालय उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्याधिकारी सोमनाथ जाधव व नगराध्यक्ष सुरज लोळगे यांच्याकडे तालुका अध्यक्ष सोमनाथ शिंदे यांनी केली आहे . यावेळी शिवाजी गाडे , माऊली बावणे , बाबा आडसुल , विजय खडसन आदींची उपस्थिती होती . 
         तालुक्यातील पत्रकारांना बसण्या उठण्यासाठी व बातमी संकलन केल्यानंतर कामकाज हाताळण्यासाठी अधिकृत जागा , कार्यालय उपलब्ध नसल्याने पत्रकारांची तारांबळ होत आहे . तसेच प्रत्येक दैनिकाचे प्रतिनिधी व महाराष्ट्रातील पत्रकार संघाचे पदाधिकारी याना थांबण्यासाठी कार्यालय उपलब्ध नाही . त्यामुळे पत्रकारिता करताना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे  त्यामुळे प्रशस्त कार्यालय उपलब्ध करून देण्यात यावे . प्रशस्त कार्यालय  मिळाल्यास पत्रकारांना बातमी संकलन करण्यास सोयीस्कर होईल . मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी दिले आहे .

Post a comment

0 Comments