पैठण तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने तहसिलदार चंद्रकांत शेळके यांना दिले निवेदनशासनाने प्रलंबित मागण्या पुर्ण कराव्यात-महसूल संघटना
औरंगाबाद विभागात रखडलेल्या पदोन्नती बाबत व प्रलंबित विभागीय फौजदारी खटल्यातील संबंधित अधिकारी तहसीलदार, नायब तहसिलदार, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, वाहन चालक, शिपाई, कोतवाल संवर्गातील अधीकारी कर्मचारी यांचे बाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन कर्मचारी यांच्या मागण्या पूर्ण करणे बाबत वेळोवेळी निवेदने देऊनही मागण्या बाबत शासनाने कोणतीही चर्चा न केल्यामुळे विभागीय अध्यक्ष मराठवाडा महसूल कर्मचारी संघटना औरंगाबाद यांनी दि.२८/१०/२०२० ते २९/१०/२०२० या दोन दिवसीय सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले आहे. त्यामुळे आज पैठण तहसिल कार्यालयात शुकशुकाट पाहवयास मिळाला. तसेच तालुक्यातून आलेल्या लोकांचे काम होऊ न शकल्यामुळे हताश होऊन घरी परतावे लागले. त्यामुळे पैठण तहसील कार्यालयातील कामकाज दोन दिवस खोळंबणार आहे. सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागला व आल्या पावली परत जावे लागले.
वरील मागणीचे निवेदन पैठण तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार पंडुरे, नायब तहसीलदार कमल मनोरे उपस्थित होते.

Post a comment

0 Comments