बिहारमध्ये शिवसेनेशी युती नाही, राष्ट्रवादीचं ठरलं!

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी  राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला आहे. बिहारमध्ये शिवसेनेसोबत युती करणार नाही, असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल  यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष बिहारमध्ये स्वतंत्रपणे लढताना दिसतील.

 निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) यांच्यासोबत जाण्याची राष्ट्रवादीची तयारी होती. आम्ही काँग्रेस आणि राजदबरोबर चर्चा केली. आम्ही केवळ ४ ते ५ जागा मागितल्या, पण आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.

Post a comment

0 Comments